‘आभाळमाया’तील अक्का "शुभांगी जोशी" यांचं निधन

मुंबई (सह्याद्री बुलेटिन ) - ‘आभाळमाया’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्का "शुभांगी जोशी" यांचं आज पहाटे निधन झालं. शुभांगी जोशी यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिकांना न्याय देणाऱ्या शुभांगी जोशी यांनी अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. ‘आभाळमाया’,‘काहे दिया परदेस’. प्रत्येक मालिकेमध्ये त्यांची भूमिका विशेष गाजली होती.कलर्स वाहिनीवरील ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती.

Review